kalyan crime news sakal
मुंबई

Mumbai Crime: महागड्या गाड्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

Kalyan News: पोलीसांची तपासयंत्रणा सक्रिय: अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

शर्मिला वाळुंज

दुचाकीचे हँडल लॉक आहे का पहायला गेला आणि पोलिसांच्या तावडीत तो सापडला. अल्पवयीन मुलाच्या मदतीने स्टेशन परिसरातील महागड्या गाड्या चोरणाऱ्या दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

चिन्मय तलावडे (वय 20) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात 3 अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यांत चोरी केलेल्या 3 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. म्हसोबा चौक परिसरात 14 फेब्रुवारी ला पोलिसांनी सापळा रचला होता.

पोलिसांनी एका मोटार सायकल ला जावे तसेच ठेवून ती परिसरात उभी केली होती ही गाडी चेक करण्यासाठी चिन्मय तेथे गेला. यादरम्यान मोटरसायकलीचे हँडल लॉक आहे हा हे पहात असताना चिन्मय पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याने 17 वर्षीय मुलाच्या साथीने या भागात चोऱ्या केल्या होत्या. त्यांच्याकडून 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

दुसऱ्या घटनेत दिनेश कुमार शर्मा यांचे 28 जानेवारीला बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती. याचा शोध सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यानुसार उल्हासनगर 4 येथून तीन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मौज मजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ही मोटर सायकल हस्तगत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT