mumbai crime sakal
मुंबई

Mumbai Crime: 2 लाखांसाठी केले 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण; 18 वर्षीय तरुणीसह साथीदाराला पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: मुंबईत 2 लाख रुपयांसाठी एका 18वर्षीय तरुणीने 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली होती. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणी आणि तिच्या 2 साथीदारांना अटक केली. सानिका वाघमारे ,पंकज पोखरकर, सार्थक बोंबले अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वडाळा परिसरात वास्तव्यास असलेले सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. तो अचानक गायब झाला. याबाबत चौरसिया यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. याच परिसरात वास्तव्यास असलेली सानिका वाघमारे या मुलाला घेऊन जात असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसले. त्यानुसार पोलिसांनी सिनिकाचा शोध सुरू केला.काही वेळातच 2 तरुण अपहरण झालेल्या मुलाला घेऊन वडाळा पोलीस ठाण्यात आले.

आरोपी तरुणीनेच या मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास त्यांना सांगितले होते. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर आरोपी तरुणीला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. पवन पोखरकरने या मुलाचे अपहरण करण्यास सांगितल्याचे सानिकाने कबुल केले. यासाठी पवन तिला दोन लाख रुपये देणार होता. सानिकाच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी पवन आणि त्याचा साथिदार सार्थक बोंबले या दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT