girl Sexual Abuse sakal
मुंबई

Mumbai Crime : 14 वर्षीय मुलीचे नातेवाईकांकडून अपहरण व लैंगिक अत्याचार; 2 आरोपी अटकेत

कुर्ला परिसरात 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कुर्ला परिसरात 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे.

मुंबई - कुर्ला परिसरात 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी पिडीत मुलीचे नातेवाईक आहेत. दोन्ही आरोपींनी कोलकात्याला नेऊन पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा विनोबा भावे नगर पोलिसांनकडे दाखल गुन्ह्यात आरोप केला आहे. अटक आरोपी 19 व 35 वर्षांचे असून कुर्ला पश्चिम येथील रहिवासी आहेत.

आरोपी पीडित मुलीचे नातेवाईकानी कोलकात्यात मुलीला एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींनी पीडित मुलीच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन राहत्या घरातून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर मुलीला कोलकात्याला नेऊन तेथे एका खोलीत डांबून ठेवले. मुलीची सुटका झाल्यानंतर तिने आई वडिलांना सर्व घटना सांगितली.

नंतर पिडीत मुलीच्या कुटुंबियांकडून याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT