Crime News 
मुंबई

Mumbai Crime : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून! आरोपी पती बंगालमधून अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ‘विवाहबाह्य संबंध’ असल्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधून अटक केली. आरोपी तरुणासोबत त्याच्या 20 वर्षीय साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब शेख या आरोपी पतीला त्याची पत्नी उम्मेजान हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता .आरोपी पतीने त्याचा साथीदार सलमान उर्फ रज्जन कुल्लू खान याच्या मदतीने 24 मे रोजी दुपारी उम्मेजानची घरातच गळा दाबून हत्या केली होती.

तसेच अंधेरीतून त्याच दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

रेतीबंदर परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला होता. सर्वप्रथम पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यास सुरुवात केली. तपासणी दरम्यान तपासकर्त्यांना एक तीनचाकी टेम्पो संशयास्पदरित्या फिरताना दिसला.

टेम्पोच्या मागावर पोलीस होते. स्थानिक आणि इतर आरटीओ कार्यालय तसेच गोपनीय बातमीदारांकडून टेम्पोची माहिती घेण्यात आली. यातून टेम्पो अंधेरी परिसरातील नागरिकाचा असल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी अंधेरी परिसरात चौकशी केली असता आरोपी त्याच्या गावी गेल्याची माहिती पोलिसाना मिळाली. पोलिसांनी मुर्शिदाबाद पश्चिम बंगालहून आरोपी पती नवाब शेखला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT