मुंबई

कारवाईसाठी गेलेल्या NCB अधिकाऱ्यांच्या अंगावर आरोपीने सोडले श्वान

पूजा विचारे

मुंबई: एनसीबीनं वांद्रे परिसरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनसीबीनं एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली आहे. या आरोपीकडून २ लाखांचे ड्रग्ज आणि २.३० लाख रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी असलेला विद्यार्थ्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयानं त्याला ४ दिवसांची NCB कस्टडी दिली आहे. आरोपीनं कम्प्यूटरच्या CPU मध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. मुंबईच्या वांद्रे, खार आणि अंधेरी या भागांमध्ये तो अंमली पदार्थांचा पुरवठा करायचा.  

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीची टीम रात्री उशिरा वांद्रे  याठिकाणी पोहोचली. अयान सिन्हा असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीनं आपल्या घरामध्ये दोन कुत्रे पाळले होते. एनसीबीची टीम कारवाई करण्यासाठी घरात शिरताच त्यानं ते कुत्रे एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर सोडले. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी आपल्या कारवाईत कुठेच खंड पडून दिला नाही. त्यांनी आपली कारवाई सुरुच ठेवली. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून मोबाईल फोन, कम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि ड्रग्ज मोजण्याची मशीन जप्त केली आहे. आरोपी ड्रग्ज विकण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंटचा वापर करत होता. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला चार दिवस पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

mumbai crime NCB arrested Nineteen year old Ayan Sinha marijuana supplier

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT