Mumbai Crime News Esakal
मुंबई

Mumbai Crime News: क्रूरतेचा कळस! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण; महिलेची प्रकृती चिंताजनक

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये मुंहईसह राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने या पिडीत महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यात, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीरावर अमानुष वार केले आहेत.

या घटनेनंतर ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या पिडीत महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक वय 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असं सांगून महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि आरोपी पळून गेला.(Marathi Tajya Batmya)

मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळूली. महिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पीडित महिलेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने आपल्या आरोपाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल- चित्रा वाघ

या संपुर्ण प्रकरणावर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडलीय. घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले."

"या घटनेबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पीड़ित महिलेला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर आरोपी ढोकेलाही तासाभरातच अटक करून त्याची चौकशी सुरू केली. त्यात त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली असल्याने लगेचच त्याच्यावर बलात्कार- मारहाण संबंधित कलमांतर्गत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

आज राजावाडी मी व माझी माझी सहकारी आशा मराठे हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची व तिच्या परीवाराची भेट घेतली. आज पहाटेच पिडीतेला हॉस्पिटल ला दाखल केल्याने अजुन दोन दिवसांनी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून आणखी काही म्हणण तिच असेल तर त्याची नोंद घेतली जावी. तसेच, मनोधैर्य योजनेसाठीच्या कागदपत्रांची पुर्तता पोलिसांनी लवकर करून संबंधित विभागात पाठवावी ही विनंतीही पोलिसांना केली".

"पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, हे नक्की ! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT