Crime News 
मुंबई

Crime News : महावितरणच्या भरारी पथकासह पोलिसांना मारहाण; गावकऱ्यांनी गाडीही फोडली

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - अनधिकृत रित्या वीज जोडणी, मीटरमध्ये फेरफार करत खोणी गावात वीज चोरी केली जात होती. वीज चोरी विरोधात कारवाईस गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांवर गावकऱ्यांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

जमावाने पथकाच्या गाडीवर दगडफेक करत गाडीचे नुकसान केले. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी जप्त केलेला मीटर देखील जमावाने हिसकावून घेतला. जमावाने एकदम हल्ला चढविल्याने भरारी पथकाने गावातून पळ काढत थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले. मानपाडा पोलिसांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी जमाव विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

वीज चोरी विरोधात महावितरणकडून धडक कारवाई सुरु आहे. कल्याण ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असून या ठिकाणी भरारी पथकाकडून कारवाई ही सुरुच असते. डोंबिवली जवळील खोणी गावात बुधवारी दुपारी महावितरणचे तीन भरारी पथक कारवाई साठी गेले होते.

यापूर्वीही ग्रामीण भागात गावकऱ्यांकडून भरारी पथकास मारहाण झाल्याचे उदाहरण असल्याने यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचे सहकार्य घेतले होते. त्यानुसार मानपाडा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली जात होती. खोणी गावातील ठोंबरे यांच्या घरातील वीज मीटरची पहाणी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

त्यामध्ये छेडछाड करण्यात आली असल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी त्याची पहाणी करत ते मीटर ताब्यात घेतले. ही कारवाई केल्यानंतर भरारी पथक गावातून निघणार तोच तेथे जमाव गोळा झाला, त्यांनी भरारी पथकाच्या गाड्या अडविल्या.

गाडीवर दगडफेक करत भरारी पथक, पोलिस कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर खेचले. त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मानपाडा पोलिस ठाण्यातील व्ही. एस. वाघमारे या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण होऊन ते यात जखमी झाले आहेत.

मारहाणीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी जमावास पांगविण्यास सुरुवात केली. महावितरण कर्मचाऱ्यांनी तेथून पाय काढत थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले. महावितरण कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुरावे गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

खोणी गाव येथे वीज चोरी मोहीम राबिवण्यासाठी दुपारी 12 वाजता गेलो होतो. दरम्यान एका बंगल्यात वीज चोरी पकडण्यात आली. तेथे संपूर्ण कारवाई झाल्यानंतर आम्ही निघणार तेवढ्यात तेथील गावकऱ्यांनी जमाव गोळा करत आमची गाडी अडविली. गाडी गावाबाहेर निघू दिली नाही. त्यांनी गाडीवर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भरारी पथक कर्मचारी व पोलिसांना यामध्ये मारहाण करण्यात आली आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आलो असून अद्याप प्रक्रिया सुरु आहे.

- राजेश म्हसणे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुरुपौर्णिमेनिमिच्या दिवशी सोन्याची गोड बातमी! सलग दुसऱ्या दिवशी भाव घसरले; मुंबई-पुण्यातील ताजा सोनं-चांदीचा भाव पाहा

Pandharpur Flood: चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली; उजनीचे पाणी पंढरीत पोचले, दगडी पुलासह आठ बंधारे पाण्याखाली

१६ दिवसांपूर्वी उद्घाटन, १६ कोटींचा पूल पहिल्याच पावसात खचला; काँग्रेस नेता पोहोचला दुर्बिण घेऊन

Live Marathi News Update : शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने बांधकाम विभागावर जप्तीची कारवाई

Nashik Earthquake: भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला, 4 दिवसांत 7 सौम्य धक्के; सुरगाणा-दिंडोरीच्या भूगर्भीय रचनेचा परिणाम

SCROLL FOR NEXT