मुंबई

रस्त्यावर थुंकला म्हणून थेट अपहरण आणि खंडणी, मुंबईतील भीषण प्रकार वाचा 

अनिश पाटील

मुंबई : माहीम येथुन एका तरूणाला पोलिस असल्याचे सांगत त्याचे अपहरण करीत खंडणी उकळणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला माहीम पोलिसांनी पोलिसानी अटक केली आहे. अमित अशोक तावडे असं 29 वर्षीय तोतयाचे नाव असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमित तावडे आरोपी हा क्लिन-अप मार्शल म्हणून काम करत असून त्याच्याकडे  पालिका पर्यवेक्षकाचे ओळखपत्र सापडले आहे. 22 फेब्रुवारी रोजी जुबेर कय्युम खान हा 20 वर्षीय तरूण माहीम येथे आला होता. यावेळी तो रस्त्यावर थुंकल्याचे अमित तावडे त्याने पाहिले. यावेळी अमित तावडे याने या तरूणाला आपण पोलिस असुन, रस्त्यावर थुंकल्याने, दंड आकारला जातो. यमुळे तुला पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर या तरूणाला त्याच्या दुचाकीवर बसविले. मात्र अमितने दुचाकी पोलिस ठाण्यात नेण्याऐवजी जोगेश्वरी येथे आणली. यावेळी जुबेर याला संशय आल्याने, त्याने दुचाकी थांबविण्यास सांगितले. अमितने दुचाकी थांबवित जुबेरला दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच धक्काबुक्की देखील केली.

यावेळी त्याने जुबेरकडे 10 हजार रुपयांची खंडणी मगितली. मात्र घाबरलेल्या जुबेरकडे एवढे पैसे नसल्याने, त्याने 5 हजार रुपये काढुन दिले. तसेच याची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी अमितने दिली होती. मात्र, घाबरलेल्या जुबेरने अखेर मंगळवारी रात्री माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला मिळताच, त्यांनी अमित तावडे याला अटक करीत, माहीम पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

mumbai crime news clean up marshal kidnaping and extortion case mahim

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT