Mumbai Crime news  esakal
मुंबई

खाऊचे पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात सोडले घर

खाऊला पैसे दिले नाहीत म्हणून घर सोडून गेलेल्या बालकाला ठाणे शहर (Mumbai news) पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे: खाऊला पैसे दिले नाहीत म्हणून घर सोडून गेलेल्या बालकाला ठाणे शहर (Mumbai news) पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तो फिरताना आढळून आला होता. तेथून त्याला (Crime News) बालसुधारगृहात नेण्यात आले होते. त्याची विचारपूस केल्यानंतर तो रायगड जिल्ह्यातील शेलू येथे राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) त्याच्या पालकांशी त्याची भेट घडवून आणली.

नीलेश या नऊ वर्षीय मुलाचे आई-वडील शेलू येथे वीटभट्टीवर काम करतात. त्यामुळे त्याला त्याच्या आजी-आजोबांकडे खर्डी येथे सांभाळ करण्यास ठेवण्यात आले आहे. होळीनिमित्त तो शेलू येथे आला होता. २० मार्च रोजी त्याने आई-वडिलांकडे खाऊसाठी पैसे मागितले, पण ते न मिळाल्याने तो रागाच्या भरात लोकल ट्रेनमध्ये चढला व थेट सीएसएमटीला पोहोचला. पण स्थानकावर गस्तीला असणाऱ्या पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याची विचारपूस केली गेली. तेव्हा तो शेलू येथे राहण्यास असून त्याच्या वडिलांचे नाव शंकर असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला बालसुधारगृहात नेले. सुधारगृहाच्या अधीक्षिका निकीता साठे यांनी त्याची माहिती ठाणे शहर पोलिसाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला दिली. तेव्हा युनिटने त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याचे आई-वडील मुलगा हरवल्याची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचलेच होते.

रागाच्या भरात तो लोकलमध्ये बसला आणि थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचला. तेथे फिरत असताना त्याला पोलिसांनी माटुंगा बालसुधारगृहात नेले. ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने त्याच्या पालकांचा शोध घेतल्याने आता तो स्वगृही परतला आहे.

- प्रीती चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT