Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : बायकोने आईची बाजू घेतल्याने संतापला नवरा! पतीने रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल, पण...

पत्नीने नवऱ्याला आपल्याला ते पैसे नकोत असे म्हणत आईची बाजू घेतल्याने नवऱ्याला राग आला.

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime - जमिनीच्या वादातून कोण कोणाचा कधी जीव घेईल याचा काही नेम नाही. रक्ताची नाते देखील या वादाला बळी पडली आहेत. आईला तिच्या माहेरच्या जमिनीचे मिळालेले पैसे तिने द्यावे म्हणून मुलगा तिच्याकडे सतत तगादा लावत होता. पत्नीने नवऱ्याला आपल्याला ते पैसे नकोत असे म्हणत आईची बाजू घेतल्याने नवऱ्याला राग आला.

या रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबून तीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आरडाओरडा ऐकल्याने शेजाऱ्याने घरात धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संतोष म्हसकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील भोपर कमानीजवळील मुक्ताई कॉलनीत संतोष म्हसकर आपल्या कुटुंबासह राहतात. संतोष यांची आई त्यांच्यापासून वेगळी राहते. संतोषच्या आईला तिच्या माहेरुन जमिनीचा हिस्सा मिळाला होता. ही जमीन विकल्याने तिच्याकडे पैसे आले होते. जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे मला दे असा तगादा संतोष ने आईकडे लावला होता. परंत संतोषला दारुचे व्यसन असल्याने ती त्याला पैसे देत नव्हती.

आई पैसे देत नसल्याने संतोष आणि त्याची बायको सुहासिनी यांच्यात वाद झाला. यावेळी दारु पिता तर पैसे कशाला हवेत. आपल्याला त्यांचे पैसे नको असे सुहासिनीने संतोषला सांगितले. बायकोच्या अशा बोलण्याचा त्याला राग आला. तिला शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. तिचा गळा दाबुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घरात होणारा वाद ऐकूण शेजाऱ्याने घरात धाव घेत सुहासिनी हिची सुटका केली. त्यानंतर सुहासिनीने आपल्या कुटुंबासह मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पतीच्या विरोधात मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी संतोषला अटक केली असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT