Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : माथेफिरूने तरुणीला मारली अचानक मिठी... अन् पुढे काय झाल ?

कल्याण स्कायवॉकवरील घटना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - लोकलने प्रवास करत नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी एक तरुणी कल्याणच्या स्कायवॉकवरुन प्रवास करत होती. यावेळी स्कायवॉकवरील एका माथेफिरुने तरुणीला अचानक मिठी मारली. माथेफिरुच्या या कृत्याने तरुणीने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या जमावाने माथेफिरूला पकडून चोप दिला.

या घटनेची माहिती काही जागरुक प्रवाशांनी कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ सीसीटिव्ही तपासत माथेफिरुला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. दरम्यान रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दुल्ले, भिकारी यांचे बस्तान गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा वाढू लागले आहे. यामुळे महिलांना येथून प्रवास करताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

अशाप्रकारच्या घटना इतर महिला प्रवाशांसोबत घडू नये म्हणून रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते पहावे लागेल. सोमवारी सकाळी कामावर जाण्यासाठी पिडीत तरुणी निघाली होती. कल्याण रेल्वे स्थानकात कर्जत दिशेकडील पादचारी पुलावरुन ती प्रवास करत होती. जवळपास 6.45 च्या सुमारास लोकल पकडण्यासाठी ती जात असताना पूलावरील एका माथेफिरुने अचानक तिला मिठी मारली.

अचानक स्वतः सोबत घडलेल्या या कृत्याला घाबरुन तरुणीने आरडा ओरडा सुरु केला. तात्काळ आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी त्या माथेफिरुच्या तावडीतून तिची सुटका करत त्याला चोप दिला. यावेळी संबंधित तरुणी त्या घटनास्थळावरुन निघून गेली. मात्र घडलेल्या या घटनेची माहिती काही जागरुक नागरिकांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे या सातत्याने रेल्वे पोलिस व आरपीएफ यांना माहिती देत त्याचा पाठपुरावा करीत होत्या. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तात्काळ चार पथक नेमून रेल्वे परिसरातील सीसीटिव्ही तपासण्यास सुरुवात केली.

त्याआधारे या माथेफिरुचा शोध घेतला जाऊ लागला. पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतले असून संतोष शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत या माथेफिरुला दुखापत झाली असून त्याच्यावर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेमुळे कल्याण स्कायवॉकवरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पादचारी पुलावर गर्दुल्ले, भिकारी यांचे बस्तान वाढत आहे. कल्याणच नाही तर कोपर, दिवा, डोंबिवली या स्थानकांवरही रात्रीच्या वेळेस गर्दुल्ले येऊन बसलेले असतात. यामुळे रात्री अपरात्री प्रवास करताना महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना असते. यांसारख्या घटनांना आळा घालण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांसमोर असून आता प्रशासन काय भूमिका घेते पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT