mumbai crime For second marriage he killed his child police esakal
मुंबई

Mumbai : लग्नास नकार दिल्याने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार

जखमी महिलेवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 एप्रिलला ही घटना घडली होती.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - आपण लग्न करू तू माझ्या सोबत ये अशी विचारणा त्याने तिला केली होती. तिने नकार देताच त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. एकतर्फी प्रेमातून झालेल्या या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली होती.

तेव्हापासून टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस जिग्नेश जाधव या प्रेमीचा शोध घेत होते. नाशिक येथे तो लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक येथून त्याला अटक केली आहे.

वाशिंद येथे राहणारी 25 वर्षीय महिला ही डोंबिवली मध्ये आपल्या आईच्या घरी डोंबिवली मध्ये आली होती. यावेळी त्याच परिसरात राहणार तिचा मित्र जिग्नेश याने तिला भेटून माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, तू मला आवडते असे सांगितले.

यावर सदर महिलेने लग्नास नकार दिला. याचा राग आल्याने जिग्नेश याने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तीला गंभीर जखमी केले होते. जखमी महिलेवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 एप्रिलला ही घटना घडली होती. याप्रकरणी टिककनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत जिग्नेश याचा शोध सुरू केला होता.

आरोपी जिग्नेश हा नाशिक येथे असल्याची गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली होती. टिळकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, श्याम सोनवणे,

अजित राजपूत संदीप सकपाळ, उमेश राठोड, रवींद्र बागल यांच्या पथकाने आरोपीला नाशिक येथून अटक केली. आरोपी जिग्नेश यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण बाकले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT