Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: रिक्षा चोरास अंबरनाथमधून अटक, पोलिसांनी केल्या 4 रिक्षा हस्तगत अन्...

शहरात रिक्षांची संख्या जास्त असल्याने चोरट्यांनी रिक्षा चोरी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांत रिक्षा चोरीला जाण्याच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली परिसरात रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली असल्याने चोरट्यांनी आता रिक्षांनाही आपले लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. रिक्षा चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यास टिळकनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अंबरनाथ येथून अटक केली आहे.

देवल उर्फ गणेश गायकवाड (वय 30) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणत 4 रिक्षा देखील हस्तगत केल्या आहेत.

शहरात रिक्षांची संख्या जास्त असल्याने चोरट्यांनी रिक्षा चोरी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांत रिक्षा चोरीला जाण्याच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. गोरगरिबांचे हे उदरनिर्वाहाचे साधन असून अनेक चालक हे कर्ज काढून रिक्षा विकत घेऊन व्यवसाय करीत आहेत.

अशात रिक्षाच चोरीला गेल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद होत आहे. रिक्षा चोरीचे वाढते प्रमाण पाहता या गुन्ह्यांची उकल करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याची सुचना पोलिस आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यात देण्यात आल्या आहेत.

टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी तातडीने सहाय्यक पोलिस निरिक्षक जगन्नाथ शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्याम सोनावणे यांच्या पथकाची नेमणूक केली.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी पाहिले असता एक व्यक्ती रिक्षा चोरी करत असल्याची बाब निदर्शनास आली. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली. अंबरनाथ येथील तो रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ आरोपी देवल याचा शोध घेत अंबरनाथ मधील भेंडीपाडा चाळ परिसरातून त्याला अटक केली.

देवलने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर टिळकनगर, कोळसेवाडी, मानपाडा व अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी चार गुन्ह्यांची उकल करत 4 रिक्षा हस्तगत केल्या आहेत. देवल याने आणखी काही रिक्षा चोरी केल्या आहेत का ? त्यांची विक्री तो कोणाला करत होता ? आदि बाबींचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT