Local 
मुंबई

Crime: सॉफ्टवेअर इंजिनिअरचा रेल्वेला चुना! व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅपच्या मदतीने बनवले बोगस पास!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने एसी लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाला चार हजार ८०० रुपयांचा बोगस एसी तिमाही सीझन तिकीट (क्यूएसटी) पाससह रंगेहात पकडण्यात आले. अमन नखरानी (२१) असे आरोपीचे नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅपच्या वापर करून अनेकदा बनावट पास बनवले आणि ते आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना वितरित केल्याचे निष्पन्न झाले.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२३ रोजी पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी आणि दक्षता पथकांनी केलेल्या नियमित तपासणीदरम्यान सदर प्रवासी चर्चगेट-बोरिवली एसी लोकलमध्ये प्रवास करत होता. तिकीट मागितल्यावर त्या व्यक्तीने त्याचे यूटीएस तिकीट दाखवले, पण तिकीट तपासनीसांना ते संशयास्पद वाटले. (Latest Marathi News)

तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी त्याला सीझन तिकीट दाखवण्यासाठी त्याचे युटीएस अ‍ॅप उघडण्यास सांगितले, ज्यावर अमन नखरानीने उत्तर दिले की माझ्याकडे दुसर्‍या फोनमध्ये पास आहे आणि माझ्या सध्याच्या फोनवर त्याची फोटो नाही. तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी पासच्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी यूटीएस नियंत्रण कक्षाकडे चौकशी केली. त्यानंतर ही पास बनावट असल्याचे आढळले. (Marathi Tajya Batmya)

या प्रकरणाचा अधिक तपास करताना, दक्षता पथकाला आढळून आले की, नखरानी यांनी सीझन तिकिटाच्या तपशीलांमध्ये फेरफार करण्यासाठी व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप 'व्हीएन अ‍ॅप' वापर केला होता. त्याने अनेक वेळा हेराफेरी करून बनावट पास बनवले आणि ते आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना वितरित केल्याचे निष्पन्न झाले.

अधिक तपास केल्यानंतर त्याच्या फोनमधून ४८ हजार रुपये किमतीची ११ युटीएस तिकिटे जप्त करण्यात आली, जी बनावट होती. आरोपी व्यक्तीला नंतर खोटेपणाच्या आरोपावरून पुढील कारवाईसाठी जीआरपी अंधेरीकडे सोपवण्यात आले आणि एफआयआर नोंदवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT