Online safety resources cyber crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: स्टँडअप कॉमेडियन तरुणीचा 'ऑनलाईन' पाठलाग,गुन्हा दाखल; वाचा नक्की काय घडलं?

Unknown Person Stalking Comedian: चाहत्यांच्या अशा वागण्याची सवय असल्याने तरुणीच्या सल्ल्यानुसार वडिलांनी या ईमेलकडे दुर्लक्ष केले.

Chinmay Jagtap

Bandra Police Sation: स्टँडअप कॉमेडियन(हास्य कलाकार) तरुणीचा गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पाठलाग करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात वांद्रे पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला. अलीकडे या व्यक्तीने हास्य कलाकार तरुणीला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली होती.

वांद्रे येथे वास्तव्य करणाऱ्या या तरुणीचे इंस्टाग्रामवर साडेचार लाख फॉलोअर आहेत. या तरुणीच्या विनोदी कार्यक्रमांना रसिक गर्दी करतात.

दोन वर्षांपूर्वी शॉन_ डी_पिल्ले या इंस्टाग्राम खातेधारकाने या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मात्र तरुणीने ती स्वीकारली नव्हती. हा खातेधारक तरुणीच्या फोलोअरपैकी एक होता. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून या व्यक्तीने तरुणीच्या वडिलांना ईमेल पाठवण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या अशा वागण्याची सवय असल्याने तरुणीच्या सल्ल्यानुसार वडिलांनी या ईमेलकडे दुर्लक्ष केले.

दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या तरुणीच्या पालकांना एक पार्सल प्राप्त झाले. त्यात एक पर्स होती. हे पार्सल तरुणीने ऑर्डर केले नव्हते. तेव्हा मात्र या तरुणीने वडिलांचे ईमेल तपासले.

त्यात शॉनपिल्ले 05 या ईमेल आयडी वरून असंख्य मेल प्राप्त झाल्याचे तरुणीस समजले. त्यात अश्लील संदेश अढळताच तरुणीने तातडीने वांद्रे पोलीस ठाणे गठून तक्रार दिली.

या तक्रारीची गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान काद्यातील ६७ आणि भातिय न्याय संहितेतील ७८ या कलमानुसार गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT