Culprit arrested sakal media
मुंबई

मुंबई : 33 लाखांचं कोकेन जप्त ; नायजेरियन नागरिकाला अटक

मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांच़्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकानं (Anti narcotic cell) मुंबईतल्या मस्जिद बंदर परिसरातून 33 लाखाचं कोकेन विक्रीसाठी (cocaine selling) जवळ बाळगणाऱ्या एका नायजेरियन नागरिला अटक (Nigerian culprit arrested) केली आहे. तो कुणालातरी विकण्यासाठी जात होता. (Mumbai police of Anti narcotic cell arrested Nigerian culprit and seized thirty three lac rupees cocaine)

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहीफळे यांच्या टिमला गस्त घालत असताना मस्जिद बंदर परिसरात एक नायजेरियन व्यक्ती संशयास्पद रितीनं फिरताना दिसला, त्याला हटकलं तेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त़्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं बरीच झटापट केली. बरेच प्रयत्न केल्यानंतर तो शांत झाला तेव्हा त्याची झडती घेतली, तर त्याच्याकडे 110 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ सापडला ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 33 लाख इतकी आहे.

बोयेगा हबीब अबुबकर असं या 45 वर्षीय नायजेरियन नागरिकाचं नाव आहे. तो नायजेरियातल्या लागोस जिल्ह्यातला राहणारा आहे. बोयेगा अबुबकर हा 2019 मध्ये मुंबईत आला असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. तसंंच तो सध्या वसईला राहत असल्याचंही त़्यानं सांगितलं आहे. त्यानं सांगितलेल्या पत्त्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाची एक टीम तपास करत आहे. मुंबईत अंमली पदार्थ विकत असुन त्याची मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बोयेगा अबुबकर याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे कोकेन व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही, त्याच्याकडे फोनही नव्हता. त्यामुळं हा फक्त कॅरियर म्हणजेच डिलिव्हरी देणारा असणार असं आम्हाला वाटतंय, तसंच त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाही आम्ही तपासतोय, त्याचा व्हिसा संपलेला असण्याची शक्यता आहे असं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझादमैदान युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांनी सांगितलं.

बोयेगा याच्यावर एनडीपीएस कायद्याच़्या कलम 8(क), 21(क) तसंच परदेशी नागरिक कायद्याच्या कलम 14 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर केलं तेव्हा त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT