Crime  sakal media
मुंबई

मुंबई : रेशन धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; 24 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेशन दुकानात (Rationing shop) गरिबांसाठी असणाऱ्या धान्याचा काळाबाजार (illegal marketing) करणारी टोळी मुंबई पोलिसांनी (Mumbai police) पकडली आहे. हे धान्य एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये लादताना पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. यात २४ जणांना अटक (twenty four culprit arrested) करण्यात आली आहे.

अनेकदा रेशनच्या दुकानातून धान्याचा काळाबाजार केला जातो. पण मुंबईच्या आरे कॉलनीत रेशनचे धान्य दुकानापर्यंत पोहचू न देताच हडप करुन ते काळ्या बाजारात विकलं जात होतं. याची बातमी आरे पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली, त्यानंतर पोलिसांनी रेशन विभागातल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला तेव्हा धान्य एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये ट्रान्सफर करण्यात येत होतं. पोलिसांनी या छाप्यात रेशनचे शिक्के असलेल्या गोण्यांतून जवळपास २४ लाखाचं धान्य जप्त केलं आहे.

आरोपींना अटक करण्यात आली असून रेशनचं धान्य हे रेशनचे शिक्के असलेल्या गोण्यांमध्ये येतं. त़्यामुळं ते तसंच विकलं तर कुणालाही संशय येऊ शकतो, त़्यामुळं ते धान्य वेगळ्या गोण्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात येत होतं आणि त्यातुनच छोट्या गोण्यांमध्ये भरुन बाजारात विकण्यात येत होतं. आत्तापर्यंत किती धान्य विकण्यात आलं, कधीपासून हे धान्य विकलं जात आहे, तसंच यात आणखी कुणाचा समावेश आहे याचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT