mumbai water supply lakes level today  
मुंबई

Mumbai Dam News : मुंबईकरांना दिलासा; सातही तलावांमध्ये 80 टक्के पाणीसाठा

Mumbai Dam News : जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Dam News : मागील काही दिवसांपासून पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी सामोरं आली आहे. ती म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव फुल झाले आहेत.

जुलै महिन्यात राज्यासह मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा होत असतो. यंदा या सातही तलावांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

हा ८० टक्के पाणीपुरवठा मुंबईकरांसाठी ३०० दिवस पुरेल इतका आहे. याठिकाणी मे अखेर पर्यंत पुरेल इतका पाणी पुरवठा उपलब्ध झाला आहे.10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने आठवडाभर पुढे ढकलला आहे.

तलावांमधील पाणीसाठा

अप्पर वैतरणा - 140240 दशलक्ष लिटर

मोडकसागर - 128925 दशलक्ष लिटर

तानसा - 143769 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा - 187208 दशलक्ष लिटर

भातसा - 522032 दशलक्ष लिटर

विहार - 27658 दशलक्ष लिटर

तुळशी - 8046 दशलक्ष लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT