crime pune esakal
मुंबई

Mumbai : मालवणीमध्ये पैशाच्या वादातून मारहाणीत विवाहितेचे मृत्यू;दोघांना अटक

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. रुकय्या सय्यद व गौरी सय्यद अशी अटक महिला आरोपींची माहिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मालाडच्या मालवणी येथे पैशाच्या वादातून सासू व नणंदेने केलेल्या मारहाणीत 32 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. आयशा ऊर्फ हिना इरफान सय्यद असे मृत महिलेचे नाव आहे.ती मालाड येथील मालवणी परिसरात राहत होती.

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. रुकय्या सय्यद व गौरी सय्यद अशी अटक महिला आरोपींची माहिती आहे. मृत महिलेच्या सासऱ्यानेच या दोन महिलांना तिला मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आयशा आपल्या पतीसोबत मालवणी येथे वास्तव्यास होती. आयशाचे पती इरफान व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. इरफानने घर बांधण्यासाठी त्यांचे वडील अकबर सय्यद यांच्याकडून 10 लाख रुपये उसने घेतले होते. पण ती रक्कम इरफानने परत न केल्यामुळे त्यांचे संबंध बिघडले होते.

इरफानचा 14 वर्षांचा मुलगा धक्का मारून पळून आल्याचे कारण सांगत इरफानचे वडील अकबर, त्याची आई रुकय्या सय्यद व बहिण गौरी सय्यद गुरूवारी इरफानच्या घरी आले. त्यांनी इरफानची पत्नी हिनासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी इरफान व अकबर यांचे कडाक्याचे भांडण झाले.

त्यावेळी गौरीने इरफानची पत्नी हिनाला केसाला धरून खाली पाडले. त्यावेळी अकबरने रुकय्या व गौरी या दोघींना हिनाला मारण्यास सांगितले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर गौरी व रुकय्याने हिनाच्या पोटावर व पाठीवर लाथा मारल्या.

त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गौरी व रुकय्या यांना मालवणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT