Mumbai  
मुंबई

Mumbai : गोरेगाव-मुलुंड उड्डाण पुलाच्या कंत्राटाबाबत अभ्यास करूनच निर्णय; आयुक्तांचे स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बिहार राज्यातील दुर्घटना झालेल्या पुलाचे ज्या कंत्राटदाराने काम केले होते, त्या कंत्राटदाराला मुंबईतील गोरेगाव- मुलुंड उड्डाण पुलाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कंत्राटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. मात्र या पुलाचे काम मुंबई आयआयटीच्या मान्यतेनंतरच सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे वृत्तपत्रात आलेल्या बातम्या व कोणाच्या मागणीवरुन निर्णय घेता येणार नाही.

बिहार पूल दुर्घटनेबाबतच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. गोरेगाव येथील प्रस्तावित ६ पदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा उन्नत मार्गाचे कंत्राट एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे.

याच कंत्राटदाराकडून बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल नुकचाच कोसळला. त्यामुळे गोरेगाव व मुलुंड येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊ नये ते कंत्राट रद्द करण्यात यावे आणि कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांना दिले आहे.

मात्र कोणाची मागणी व वृत्तपत्रात आलेल्या बातम्यावरुन कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. बिहार राज्यातील पूल दुर्घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात येईल. तसेच गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाचे काम आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानंतर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी बांधकाम योग्य होत असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतरच काम सुरु करण्यात आल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या काळात यांनी महाराष्ट्राला आणि मुंबई महापालिकेला लुटण्याचे काम केले. कॅगच्या रिपोर्ट मध्ये तेच आहे. ज्या कंपनीने बनवलेला बिहारचा पूल पडला. अशा कंपनीला गोरेगाव मुलुंड टनेलचे काम दिले. उद्धव ठाकरे यांनी फक्त कमिशन घेतले. मी पालिका आयुक्तांना पत्र लिहले आहे की कामाची पाहणी पुन्हा पाहणी करून त्याची सक्षम कंपनीलाच काम द्यावे, अशी मागणी केले आहे.

-राम कदम, प्रवक्ते भाजपा

दिंडोशी कोर्ट येथे काम सुरु

गोरेगाव मुलुंड उड्डाणपूल बांधण्याचे काम आयआयटी मुंबई व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी दिलेल्या अहवालानुसार सुरु असून सध्या दिंडोशी कोर्ट येथे कामास सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT