mumbai sakal
मुंबई

Mumbai : देशात प्रवासी चारचाकींच्या मागणीत वाढ

सणासुदीच्या कालावधीत मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती येऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्याने देशात प्रवासी चारचाकी वाहनांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. उत्पादनात मात्र अजूनही तूट असल्याने यंदा प्रथमच सणासुदीला मोटारींवर फारसे ‘डिस्काउंट’ किंवा ‘ऑफर’ नसतील, अशी शक्यता वाहन विक्रेत्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनतर्फे (फाडा) ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांचे उत्पादन कमी केले आहे; मात्र सणासुदीच्या हंगामात वाहनांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी या कालावधीत मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे वाहन उत्पादक; तसेच विक्रेतेही मोटारींच्या किमतीवर फारसे डिस्काऊंट वा अन्य सवलती देणार नाहीत, अशी शक्यता ‘फाडा’ने व्यक्त केली आहे.

गेल्या दोन वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील वाहनविक्रीची तुलना केल्यास, फक्त ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे; तर रिक्षा, टेम्पो-ट्रक आदींच्या विक्रीत घट झाली आहे. आता कोरोना साथीचे सावट कमी होत असल्याने सणासुदीच्या दिवसांत वाहनांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे; मात्र कमी पुरवठा ही चिंतेची बाब असल्याचे ‘फाडा’चे म्हणणे आहे.

मोटारींची विक्री दोन वर्षांपूर्वीच्या एक लाख ९२ हजारांच्या तुलनेत या वर्षी ३१ टक्के वाढून दोन लाख ५३ हजारांवर गेली आहे. ट्रॅक्टरची विक्रीही दोन वर्षांपूर्वीच्या ५२ हजारांवरून ७१ हजारांपर्यंत गेली आहे. २०१९ मध्ये एकूण सर्व वाहनांची विक्री १६ लाख २४ हजार, २०२० मध्ये १२ लाख नऊ हजार व २०२१ मध्ये १३ लाख ८४ हजार अशी आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री गेल्या वर्षीपेक्षा वाढली असली, तरी अजूनही ती कोविडपूर्व काळातील विक्रीच्या बरोबरीला आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

Google Photos चे मोठे अपडेट! जुन्या फोटोंना द्या रेट्रो लुक; नवीन 'मूड्स' अन् AI फीचर्स लाँच..पाहा 'हे' नवे बदल..

बिग बॉसची माजी स्पर्धक दिव्या शिंदेला अटक; डॉक्टरला केली मारहाण, ५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT