नालेसफाई  sakal
मुंबई

Mumbai : मुंबईत नालेसफाई की निधी सफाई,नालेसफाईचे प्रशासनाचे दावे खोटे;विरोधी पक्ष आक्रमक

मोठ्या नाल्यातून सुमारे ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ यंदा काढण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील नालेसफाईला दीड महिना होत आला तरी अनेक नाल्यांच्या सफाईला सुरूवात झालेली नाही. नाल्यांची आतापर्यंत 37 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्ष 12 टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

मोठ्या नाल्यातून सुमारे ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ यंदा काढण्यात येणार आहे.

एकूण साडे दहा लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेवून टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यापैकी साडे सात लाख मेट्रीक टन गाळ पावसाळ्यापूर्वी मे अखेरीपर्यंत काढण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिका-यांनी दिली.

गेल्या मार्चपासून मुंबईतील छोट्या मोठ्या नाल्यांच्या सफाईकामाला सुरूवात झाली आहे. राज्यभर गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. हवामानात सतत बदल होत आहे. मुंबईतही पाऊस कधी पडेल याचा नेम नाही.

पावसाऴ्यापूर्वी करायची शंभर टक्के नालेसफाईची कामे तत्परतेने करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग पातळीवर दिले आहेत. मात्र अजूनही नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही. दरवर्षी नालेसफाईतील गैरव्यवहारावर आरोप झाले आहेत.

यंदा प्रशासकांच्या नेतृत्वाखाली नालेसफाईची कामे होत असून पालिका अस्तित्वात नसल्याने त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा अंकूश नाही. त्यामुळे प्रशासकांना नालेसफाईची कामे चोख करावी लागणार आहेत. अन्यथा ते नालेसफाईच्या टीकेचे धनी होवू शकतात असे विरोधकांचे मत आहे.

पालिका प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे खोटे आहेत. प्रशासनान म्हणते 37 टक्के नालेसफाई झाली. आतापर्यंत 12 टक्क्यांपर्यंत नालेसफाई झाली आहे ही वस्तूस्थिती आहे. अनेक नाल्यांची कामेच सुरू झालेली नाहीत. फक्त अधिका-यांचे दौरे होतात तेथेच नालेसफाई होते. फक्त दाखविण्यासाठी होत असते. त्यामुळे ही नालेसफाई की निधीसफाई असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.

रवी राजा, माजी विरोधी पक्ष नेते, रवी राजा

निधीची वाटणी

नाल्यांवर होणारा खर्च मोठ्या नाल्यासाठी ९० कोटी, छोट्या नाल्यांसाठी ९० कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT