doctor bhave 
मुंबई

दुर्दैवी! 'त्या' कोरोना योध्दयालाच उपचारांसाठी मिळाला नाही बेड; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांचं कोरोनानं निधन...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :संपूर्ण मुंबई सध्या कोरोनाच्या महाभयंकर विळख्यात अडकली आहे. मुंबईत सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४० हजारांच्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मोठ्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने आता अनेक रुग्णांना बेडसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळतेय. अशीच एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरलाच चक्क १० तास बेड न मिळाल्यानं त्यांचं निधन झालंय.

मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचं कोरोनानं निधन झालंय. डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. एका कोरोना रुग्णावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्यानंतर डॉक्टर भावे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. 

आपण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे समजताच डॉक्टर भावे स्वतः गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आले होते. मात्र तब्बल १० तास उलटूनही या कोरोना योध्याला उपचार घेण्यासाठी साधा बेडसुद्धा उपलब्ध होऊ शकला नाही. अशात डॉक्टर भावे यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान आता डॉक्टर स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन करण्यात आलं. डॉक्टर भावेंच्या निधनावर मुंबईतल्या डॉक्टरांनी दुःख व्यक्त केलंय. एका कोरोना योध्यालाच बेड उपलब्ध होऊ नये यापेक्षा दुर्दैव ते काय असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय.      

mumbai famous doctor has no more due to corona read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT