Mumbai  sakal
मुंबई

Mumbai : अखेर पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर; हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे आदेश

या आदेशांची अंमलबजावणी होते की ते फक्त कागदोपत्री राहतात हे आता पहावे लागेल.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शहरातील रस्त्यांची खड्डयांनी दुरावस्था होऊन हे खड्डे योग्य रीतीने भरले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याविषयी राजकीय पक्ष, नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार, तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र होते.

मात्र रविवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी रस्त्यावर उतरत खड्ड्यांची पाहणी केली. शहरातील खड्डे हे कोल्ड मिक्स, पेव्हर ब्लॉक तसेच डांबरीकरण करुन लवकरच भरले जातील असे सांगत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी होते की ते फक्त कागदोपत्री राहतात हे आता पहावे लागेल.

कल्याण डोंबिवलीतील अनेक डांबरी रस्त्यांची पावसाळ्यात खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या अवस्थेवरून पालिका प्रशासनावर सर्व स्तरातून टिकेची झोड उठविली जात होती. मध्यंतरी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दुचाकीवरुन रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी ही कामात हलगर्जी पणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

मात्र त्यानंतर ना कोणावर कारवाई झाली ना रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले. केवळ खडी टाकून काही प्रमाणातील खड्डे बुजविले जात होते. मात्र पाऊस आणि वाहनांच्या वर्दळीमुळे हे खड्डे उखडून परिस्थिती जैसे थे होत असे. यानंतर पालिका प्रशासनाने खड्ड्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला असून त्यावर तर खड्ड्यांच्या तक्रारींचा जणू पाऊस पडला आहे.

ही परिस्थिती पाहता पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे अखेर रस्त्यावर उतरले. रविवारी त्यांनी कल्याण मधील दुर्गाडी चौक येथील पेव्हर ब्लॉक भरणी करत असलेल्या रस्त्याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी पावसाची उघडीप मिळाली असून लवकरच पेव्हर ब्लॉक, कोल्ड मिक्स आणि डांबरीकरण या सर्व माध्यमातून खड्डे भरणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच कामात हलगर्जी पणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. यामुळे आता तरी शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे भरले जाणार का ? ते योग्य रितीने भरले जाणार का ? की आयुक्तांचे आदेश देखील केवळ कागदोपत्री राहतात हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT