mumbai fire brigade sakal media
मुंबई

अग्निशमन दलातील रोबोट धूळखात; भीषण आगीच्या दुर्घटनांमध्ये कुचकामी

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाने (Mumbai fire brigade) मोठा जगावाजा करत खरेदी केलेला रोबोट (Robot) सध्या धूळखात पडला आहे. गेल्या दोन वर्षात केवळ 7 किरकोळ आगीच्या ठिकाणी रोबोटचा वापर झाला आहे. तांत्रिक मर्यादेमुळे (technical limitations) आता रोबोटचा वापर केवळ बेसमेंट मधील घटनांमध्ये (Basements incidents) करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने घेतलेला रोबोट अग्निशमन दलासाठी पांढरा हत्ती ठरला आहे.

मुंबईत लागत असलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलातील जवानांना आत जाऊन काम करणे धोकादायक असते. काळबादेवी दुर्घटनेत तर चार अधिकाऱ्यांचा जीव गेला होता. अशा वेळी आग विझवण्यासाठी तसेच आगीच्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेण्यासाठी रोबोट वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2018 ला मुंबई अग्निशमन दलाने रोबोट विकत घेतला. रोबोट आणि त्याचे वाहन यावर साधारणता 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. रोबोट व त्याचे वाहन हाताळायला काही जवानांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. सुरुवातीला दोन रोबोट विकत घेण्याचे प्रस्तावित होते, मात्र प्रायोगिक तत्वावर एक रोबोट विकत घेण्यात आला. मात्र

काय अपेक्षित होते ?

-मोठ्या आगीच्या ठिकाणी वापार होईल

-धूर आणि उष्मा अधिक असणाऱ्या ठिकाणी उपयोग

-आगीच्या ठिकाणचे दर्जेदार लाईव्ह दृष्ट पुरवणार

-अडचणीच्या जागेवरील आग विझवणार

काय आहेत मर्यादा

-अडथळे पार करू शकत नाही

-चढण असल्यास पुढे सरकत नाही

-दर्जेदार छायाचित्र आणि व्हिडीओची मर्यादा

-अधिक धूर,उष्मा असणाऱ्या जागी उपयोग नाही

एमटीएनएल आगीत फेल

वांद्रे येथील 22 जुलै 2019 ला एमटीएनएलच्या आग प्रकरणात पहिल्यांदा वापर करण्यात आला. मात्र आगीच्या ठिकाणी काही अडथळ्यांमुळे रोबोट पुढे सरकू शकला नाही. यावेळी रोबोटच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Nagpur News: क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवासाठी जि.प. कडून २० लाखांची तरतूद

Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

Sangli Crime : सांगली हादरली! जुन्या वादाचा भयानक शेवट; वाळव्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून

Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

SCROLL FOR NEXT