bird  sakal media
मुंबई

मुंबई : फोर्ट परिसरातून १७३ पक्ष्यांची सुटका

सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई : मुंबईच्या फोर्ट (Mumbai Fort) परिसरातील एका घरात पिंजऱ्यात बंद केलेल्या तब्बल १७३ पक्ष्यांची (birds free) वन विभागाकडून (Forest Authorities) सुखरूप सुटका करण्यात आली. हे सर्व पक्षी बेकायदेशीररित्या पिंजऱ्यात (birds in cage) ठेवल्याचा आरोप वन विभागाने केला आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो आणि वन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

वन विभागाने केलेल्या कारवाईत ११० घार, ४२ पोपट, आठ वटवाघूळ, सात गव्हाणी प्रजातीचे घुबड, दोन बगळे आणि एका सिगल पक्ष्याची सुटका करण्यात आली. फोर्ट परिसरातील क्वीन मॅन्शन या इमारतीत वन विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत प्रदीप डिसूझा यांना वन विभागाने अटक केली. यावेळी डिसूझा यांच्या गच्चीवर कबुतरे, ससे, कोंबड्या तसेच कावळेही पिंजऱ्यात डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. १७३ वन्यजीव पक्ष्यांना घरात ठेवण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया डिसूझा यांनी केली नव्हती. या धाडीत आम्हाला काही वन्यजीव पक्षी मृतावस्थेतही आढळल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

BSNL ने GenZ ला दिलं सगळ्यांत मोठं गिफ्ट! 100GB डेटा अन् अनलिमिटेड कॉल; रोजचा दर फक्त 8 रुपये..संपूर्ण ऑफर एकदा बघाच

Viral Video : हनुमानांवर कमेंट करणं पडलं महागात! राजमौली यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...'मी देवावर विश्वास ठेवत नाही'

SCROLL FOR NEXT