Bus Accident On Mumbai Express Highway Esakal
मुंबई

Mumbai Express Highway: दुर्दैवी! एक्सप्रेस वेवरच संपली वारी, पंढरपूरला निघालेल्या बसचा मोठा अपघात, पाहा व्हिडिओ

Pandharpur Wari: मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत

आशुतोष मसगौंडे

मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती, नवी मुंबईचे डीसीपी पंकज डहाणे यांनी दिली. आत भाविक असलेली बस डोंबिवलीच्या केळझर गावातून पंढरपूरला जात होती.

या अपघाताबाबत अधिक माहिती देताना नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे म्हणाले, "आषाढी एकादशीनिमित्त हे लोक खासगी बसमधून पंढरपूरला जात होते. बस ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडली. यामध्ये 42 जण जखमी झाले, त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर 3 जणांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, डॉक्टरांनी 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे."

या अपघातामुळे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील मुंबई-लोणावळा लेनवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढता आली आणि तीन तासांनंतर लेनवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले दयानम भोईर म्हणाले, "माझ्या अंगाववर ३-४ लोक पडले होते. अशा परिस्थिती मी गाडीच्या बाहेर आल्यानंतर इतर ४ लोकांना बाहेर येण्यास मदत केली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आम्ही बंगालच्या जनतेचे अत्यंत ऋणी आहोत, ममता बॅनर्जींनी मानले मतदारांचे आभार

Satana Principal Felicitation: मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांचे कार्य प्रेरणादायी, भावी पिढीसाठी आदर्श - ॲड. नितीन ठाकरे

Human-Leopard Conflict: कोटमदरा येथे मानवी-बिबट व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती कार्यशाळा

Mothers Day Event: एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या मदर्स डे सोहळ्यात ‘सुपर मॉम’ सन्मान

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

SCROLL FOR NEXT