मुंबई

मुंबईत अकरावीच्या 97 हजार जागा रिक्त तरीही 36 हजार 358 विद्यार्थी प्रवेशापासून दूर

संजीव भागवत

मुंबई : मुंबई आणि महानगर क्षेत्रात असलेल्या 844 कनिष्ठ महाविद्यालयातील ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया काल पूर्ण झाली. मात्र या प्रवेश प्रक्रियेनंतर मुंबई आणि महानगर क्षेत्रातील 97 हजार 99 जागा रिकाम्या राहिल्या आणि तब्बल 36  हजार 558 विद्यार्थी अजुनही प्रवेशापासून दूर राहिले आहेत.

यामध्ये अनेक विद्यार्थी हे तांत्रिक कारणामुळे तर काही महाविद्यालये आपल्या पसंतीनुसार कॉलेज न मिळाल्याने प्रवेशापासून दूर राहिलेत. यामुळे मागील चार महिन्यापासून सुरू असलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तूर्तास संपली असली तरी अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने या विषयीचा पेच कायम राहिला आहे.

राज्यभरात यंदा अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राबवण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया खूप लांबणीवर पडली होती. काल ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र यानंतरही रिक्त राहिलेल्या जागाचा आढावा आज घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रात यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू झाली होती, त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता जाहीर झाली होती. त्यानंतर तब्बल 13 प्रवेश फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही मुंबई आणि परिसरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो जागा या रिक्त राहिल्या आहेत.

मुंबई विभागात यंदा अकरावी प्रवेशासाठी  3 लाख 20 हजार 750 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 2 लाख 60 हजार 9 विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज केले होते. तर यापैकी केवळ 2 लाख 23 हजार 651 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश घेतले आहेत. तर तब्बल 97 हजार 99 जागा मुंबई विभागात रिक्त राहिल्या आहेत. या प्रवेशानंतर मुंबई विभागात 36 हजार 358 विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले आहेत.

mumbai FYJC admission after final round of merit list more than 97 thousand seats are vacant

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT