मुंबई

गेल्या दहा वर्षात फक्त दुसऱ्यांदा मुंबईत 'हे' घडलंय..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. हिमाचल आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी देखील सुरु आहे. अशात देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये थंडीने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. 

मुंबईत राज्यातील इतर शहरांपेक्षा तशी कमीच थंडी पडते. पण गेले काही वर्ष मुंबातील तापमान कमी होताना पाहायला आणि अनुभवायला देखील मिळालं. मागच्या वर्षी रेंगाळलेली थंडी देखील मुंबई करांनी अनुभवली.  

मात्र यंदा तसं अजिबात घडताना दिसत नाही. डिसेंबर संपून आता जानेवारी सुरु होईल मात्र मुंबईतला पारा वाढतानाच पाहायला मिळतोय. आज देखील मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. 

मुंबईत पुन्हा एकदा तापमान वाढताना पाहायला मिळतंय. पुढचे काही दिवस मुंबईतील तापमान वाढलेलंच पाहायला मिळेल. क्षेत्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार काल (सोमवारी) मुंबईतील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. त्या आधी म्हणजे रविवारी हेच कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं होतं. 

हिवाळ्याच्या दिवसात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पडते. मात्र आभ्यासाकांच्या मते सध्या पश्चिमेकडून वारे वाहतायत. परिणामी यामुळेच तापमानात वाढ झालेली पाहायला मिळतेय. मागील दहा वर्षात दुसऱ्यांदा डिसेंबरच्या 20 तारखेनंतर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवलं गेलंय. 

त्यामुळे मुंबईकरांना ती गुलाबी का काय ती थंडी म्हणतात, ती थंडी यंदा कधी अनुभवायला मिळते याची प्रतीक्षा आहे. 

WebTitle : mumbai is getting hotter day by day over 34 degree temperature registered on monday

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT