bihar flyover collapse 
मुंबई

Mumbai : गोरेगाव उड्डाणपूलाचे काम बिहारमधील कोसळलेल्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीलाच; कंत्राट...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा व रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे.

त्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात यावे आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांना दिले आहे.

स्थायी समितीच्या २० डिसेंबर २०२१ रोजी भरलेल्या सभेतील विषय क्रमांक १० अन्वये रत्नागिरी हॉटेल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित ६ पदरी उड्डाण पूल, मुलुंड, खिंडीपाडा येथे प्रस्तावित उच्च स्तरीय चक्रीय उन्नत मार्ग: आणि डॉ हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाण पूल आदी कामांचे मे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीस ६६६,०६,७८,००० इतक्या रकमेचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.

मे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीतर्फे बिहार राज्यातील भागलपूर जिल्हयात गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब रविवार ४ जून रोजी पूल डिझाईन आणि तांत्रिक चुकीमुळे कोसळले.

या कंपनीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच, कामामध्ये अनेक त्रुटीही आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबई शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने सुरु केले आहे.

हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यामुळे बिहारमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. यामुळे महापालिकेचा वेळ व पैसा वाया जाणार आहे. त्यामुळे पालिकेने या कंपनीला कोणतेही काम देऊ नये व झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणारा धोका टाळण्यासाठी मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीस दिलेले कंत्राट महानगरपालिकेकडून रद्द करण्यात यावे आणि या कंपनीला काळया यादीत टाकावे असे पत्र रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद! कोणते सेक्टर दबावात? जाणून घ्या आजचा मार्केट ट्रेंड

Baramati Plane Crash : बारामतीत अजितदादांच्या विमानअपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांची पोलिस ठाण्यावर धडक...

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Latest Marathi News Live Update : 148 महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग; परिसरात भीतीचे वातावरण

Baramati Plane Crash : बारामती विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने; सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती

SCROLL FOR NEXT