Mumbai Hanuman Chalisa floated Lok Sabha Shiv Sena fear shook Delhi Banner battle Shiv Sena in Dombivli Dr Shrikant Shinde Sakal
मुंबई

Mumbai : हनुमान चालीसा लोकसभेत घुमली,शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली; डोंबिवलीत शिवसेनेची बॅनरबाजी...

शिवसेना व भाजपा खासदारांनी बाक वाजवत कौतुक केले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - संसदेतील अविश्वास प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. शिंदे यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करताच विरोधी बाकावरून आवाज आला तुम्हाला हनुमान चालीसा येते का. त्यालाही सडेतोड उत्तर देत खासदार शिंदे यांनी हनुमान चालीसाचे पठण केले.

शिवसेना व भाजपा खासदारांनी बाक वाजवत कौतुक केले असताना, डोंबिवली करांनी देखील खासदार शिंदे यांचे कौतुक बॅनर बाजी करत केले आहे. "हनुमान चालीसा लोकसभेत घुमली, शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली" असा संदेश देत दमदार खासदार, हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार या शब्दांत शिंदे यांचे कौतुक शिवसैनिकांकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसने मणिपूरचा प्रश्न पुढे करत अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावावर बोलताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्ताकारणावर बोलताना विरोधकांवर टिका केली.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले.

निवडणूक भाजपासह लढले आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी बाजूला ठेवले.” महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांमध्ये खोडा घालण्यात आला.

आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही. त्यामुळे मेट्रोचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला आहे. पायाभूत सुविधांची यांना आवश्यकताच वाटली नव्हती कारण ते घराच्या बाहेर पडत नव्हते.

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं.” हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदेंनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरुन आवाज आला तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का?

त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले होय मला पूर्ण हनुमान चालीसा येते आणि त्यांनी मग लोकसभेत संपूर्ण हनुमान चालीसा म्हणून दाखवली. त्यावेळी शिवसेनेच्या आणि भाजपाच्या खासदारांनी बाक वाजवले आणि श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं.

खासदार डॉ. शिंदे यांनी लोकसभेत म्हटलेल्या हनुमान चालीसा पठणची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असताना सर्व सामान्य नागरिक देखील त्यांचे कौतुक करत आहेत. शिंदे यांच्या हनुमान चालीसा पठणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

असे असतानाच खासदार शिंदे यांचे कौतुक करणारे बॅनर डोंबिवली मध्ये झळकले आहेत. शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या समोरील रस्त्यावर इंदिरा गांधी चौकात शिवसैनिकाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.

श्रीकांत शिंदे यांच्या फोटोसह बॅनरबाजी करत "हनुमान चालीसा लोकसभेत घुमली शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली" असे संदेश त्यावर देत

दमदार खासदार, हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार अशा शब्दांत शिंदे यांचे कौतुक करण्यात आले आहे. हे बॅनर सध्या डोंबिवली करांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT