corona 
मुंबई

मुंबईतील रुग्णांचा आकडा पोहोचला तब्बल 61 हजारांच्या पार; जाणून घ्या आजची रुग्णांची आकडेवारी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज ही बाधित रुग्णांच्या संख्येत 1359 नवीन रुग्णांची भर पडली असून  एकूण रुग्णसंख्या 61,501 झाली आहे. तर 77 रुग्ण दगावले असून मृतांचा आकडा 3,242 वर पोचला आहे. असे असले तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून आज ही 298 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.             

मुंबईत आज नोंद झालेल्या 77 मृत्यूंपैकी 53 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 59 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 7 जणांचे वय 40 च्या खाली होते. तर 43 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 27 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.           

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 716 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 43,731 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 298 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  31,338 रुग्णांना घरी सोडण्यात आले.                                                                    

मुंबईत 16 जून पर्यंत एकूूूण 2,69,608 कोविड चाचण्या करण्यात आल्या.तर 10 जून ते 16 जून दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 2.43 इतका आहे. तर मुंबईत आर मध्य, आर  उत्तर आणि आर दक्षिण या तीन विभागात रुग्णवाढीचा दर हा 4 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.           

मुंबईतील 21,64,506 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. तर 3,68,791 ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत 834 सक्रिय कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 5205 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 4993 अति जोखमीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून सीसीसी 1 मध्ये 20,365 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.

mumbai has more than 61 thousand corona patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT