मुंबई

मुंबईकरांनो सावधान ! तुम्ही पिताय ते दुध भेसळयुक्त तर नाही ना?

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईकरांना सुरक्षित व निर्भेसळ दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए) 21 व 22 जानेवारी परराज्य व जिल्ह्यातून येणार्‍या दूधावर शहराच्या सीमेवरच कारवाई करण्यात आली. दोन दिवसामध्ये एफडीएने मुंबईतील पाच जकात नाक्यांवर तब्बल 254 नमून्यांची तपसाणी केली. यामध्ये सात नमूने कमी दर्जाचे आढळून आल्याने हा साठा परत पाठवण्यात आला.

दहिसर, मानखुर्द, ऐरोली, मुलुंड चेकनाका (पूर्व), मुलुंड एलबीएस चेकनाका या पाच जकात नाक्यावरून परराज्य व जिल्ह्यातून दररोज सकाळी दूध मुंबईत येते. मुंबईमध्ये दररोज विविध प्रकारच्या ब्रँडचे दूध मुंबईत येत असते. त्यामुळे मुंबईकरांना भेसळयुक्त दूध मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून शहरात येणार्‍या दुधावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 21 व 22 जानेवारीला पहाटेच्या सुमारास मुंबईत या पाच जकात नाक्यांवरून मुंबईत येणार्‍या 170 वाहनातील 254 दूधांच्या नमुन्यांची तपासणी केली. तपासणी केलेल्या वाहनांमधील दुधाची जकात नाक्यांवरच शासकीय विश्लेषकांमार्फत तपासणी करण्यात आल्याने एफडीएच्या अधिकार्‍यांना कारवाई करणे शक्य झाले. त्यामुळे कमी दर्जाचा दुधाचा साठा परत पाठवण्यात आला.

जकात नाका, वाहने,  तपासणी केलेले नमूने 

  • मानखुर्द - 48 - 74 
  • दहिसर - 66 - 82
  • मुलुंड - 25 - 37
  • ऐरोली - 25 - 54
  • एलबीएस - 06 - 07
  • एकूण -  170 - 254

मुलुंड चेक नाका (पूर्व) या जकात नाक्यावर तपासलेल्या 25 वाहनांमधील 37 दूधांच्या नमुन्यांपैकी 5 नमूने कमी दर्जाचे तर, मानखुर्द चेकनाक्यावर तपासलेल्या 48 वाहनांमधील 74 नमून्यांपैकी 2 नमूने कमी दर्जाचे आढळून आले. या सातही दुधाचे नमूने विश्लेषणासाठी एफडीएकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन दिवसांमध्ये पाचही जकात नाक्यांवर तब्बल 6 लाख 63 हजार 93 लिटर इतके दूध घटनास्थळी तपासण्यात आले. यातील सात नमुन्यांमध्ये 3 हजार 632 लिटर दूध कमी दर्जाचे सापडल्याची माहिती एफडीए (अन्न) सहआयुक्त श.रा. केंकरे यांनी दिली. अशा प्रकारच्या अनपेक्षित धाडींचे आयोजन प्रशासनामार्फत नियमित करण्यात येणार असल्याचेही एफडीएकडून जाहीर करण्यात आले आहे. 

mumbai health news FDA conducts raids on various toll plaza to check quality of milk

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT