मुंबई : तब्बल आठ दिवसात गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये (Gastro Patients) दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या 71 रुग्णांवरून ही रुग्णसंख्या थेट 130 वर गेली आहे. त्यामुळे पालिकेकडून (BMC) नागरिकांना काळजी (people care) घेण्याचा सल्ला दिला गेला. कोरोना रुग्णसंख्या (corona patients) आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले असले तरी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणीसोबत (malaria patients) वाढणाऱ्या गॅस्ट्रोमुळे पालिका अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी गॅस्ट्रोचे 102 तर चिकनगुणियाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र यंदा ऑक्टोरच्या 17 दिवसात गॅस्ट्रोचे 130 तर चिकन गुणियाचे 19 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये (Guidelines) वाढ करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेची चिंता वाढलेली असताना आता मलेरिया,डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील केवळ सतरा दिवसांत वाढले आहेत. यात मलेरियाचे 312 डेंग्यूचे 154 तर गॅस्ट्रोचे 130 रुग्ण सापडले आहेत.
मलेरिया आणि डेंगूच्या आजारात वाढ होताना पाहायला मिळते त्याच प्रमाणे यंदाही तशीच रुग्ण संख्या आहे, मात्र दोन वर्षापासून मुंबईतून हद्दपार झालेला चिकनगुनिया मात्र यावर्षी डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईत साथीच्या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर पर्यंत मलेरियाचे 5007, लेप्टोचे 240, डेंग्यूचे 129, तर गॅस्ट्रोचे 2549 रुग्ण आढळले होते मात्र यावर्षी केवळ दहा महिन्यात मलेरियाचे 4315, लेप्टोचे 201, डेंग्यूचे 630, तर गॅस्ट्रोचे 2247 रुग्ण आढळले.
"आपल्या आसपासचा विभाग स्वच्छ ठेवा. तेथे पाणी साचू देऊ नका. फ्रीज, बाटलीची झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या आदी ठिकाणच्या पाण्याच्या थेंबातून डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची अंडी असू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नका. विभागात पाणी कुठे साठले असेल पालिकेशी संपर्क करा. लक्षणे असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करा.घरच्या घरी उपचार घेऊ नका."
– डॉ. मंगला गोमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महापालिका
ऑक्टोबर ( 17 पर्यंत)
आजार रुग्ण
मलेरिया 312
डेंग्यू 154
चिकणगुनिया 19
लेप्टो 22
गॅस्ट्रो 130
हेपेटायटीस 22
स्वाईन फ्लू 6
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.