Dengue-malaria patients sakal media
मुंबई

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सात पटीने वाढ; 865 रुग्णांची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत साथीच्या आजारांचा (Infectious diseases) ताप वाढता असून मलेरिया (malaria), डेंग्यू व गॅस्ट्रोच्या (Dengue and gastro) रुग्णांमध्ये वाढ (dengue patients increases) झाली आहे. त्यातही मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सात पटीने वाढ झाली असून 2021 मध्ये 865 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, हीच संख्या मुंबईत गेल्या वर्षी एकूण 129 एवढीच होती.

कोरोना, ओमिक्राॅन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिका झटत असताना साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 19 दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेला साथीच्या आजारांचा ताप झाला आहे.

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो लेप्टो चिकनगुनिया कावीळ हे आजार पावसाळ्यात उद्भवतात. परंतु, पावसाळा जाऊन दोन महिने होत आले तरी साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. 1 ते 19 डिसेंबरपर्यंत मलेरिया - 178, गॅस्ट्रो - 251, डेंग्यू - 29, कावीळ - 24, चिकनगुनिया - 8, लेप्टो - 2 रुग्ण आढळल्याने मुंबईत साथीच्या आजारांचे टेंशन वाढले आहे.

दरम्यान, एच1एन1 चे रुग्ण आटोक्यात असून गेल्या 19 दिवसांत एकही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर, गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती.

1 जानेवारी ते 19 डिसेंबरपर्यंत आकडेवारी

मलेरिया - 5,083

गॅस्ट्रो - 2,928

डेंग्यू - 865

कावीळ - 295

लेप्टो - 222

चिकनगुनिया - 76

एच1एन1 - 64

मलेरियाचे रुग्णही वाढले

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. मुंबईत यावर्षी 5,083 मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, हीच संख्या 2020 मध्ये 5007 एवढी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल, वाहनचालकांसाठी मोठी सूचना!

MS Dhoni vs Gautam Gambhir: गौतम गंभीरला हटवा, धोनीला आणा...; माजी भारतीय खेळाडूचा संताप

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT