High-Court-Mumbai sakal media
मुंबई

तरुणीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

सुनिता महामुनकर

मुंबई : अनुसूचित जातीमधील (schedule cast) तरुणी (girl) असल्यामुळे लग्नाला विरोध (against marriage) करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज (bail application rejects) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) नुकताच नामंजूर केला. तक्रारदार पिडीत महिला पोलीस दलात (police) काम करत आहे. आरोपीवर तिने बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात राहणाऱ्या आरोपीने पिडीतेचे आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मिडियावर (social media) पोस्ट केल्याचा आरोपही केला आहे. तसेच ती राखीव प्रवर्गातील असल्याच्या कारणांंवरुन तिच्याशी लग्न करण्यासाठी नकार दिला, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने फसवणूक केली असा आरोप पिडीत तरुणीने केला आहे. पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली आहे. तक्रारदार आणि माझ्यामध्ये सहमतीने संबंध निर्माण झाले होते, ती शिक्षित आहे, त्यामुळे ती अशी तक्रार करु शकत नाही, असा बचाव केला होता. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. आरोपीने केवळ भादंवि कायद्याचा भंग केला नाही तर अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याचा गुन्हा दाखल करायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपीच्या सोशल मिडियावर पोस्ट करण्याच्या धमकिवरही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जर आरोपीला जामीन मंजूर झाला तर त्याचे समाजात विपरीत परिणाम होऊ शकतो, असे खंडपीठाने नमूद केले आहे आणि जामीन फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT