MP Sanjay Raut sakal media
मुंबई

संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला जामीन मंजूर - HC

सुनिता महामुनकर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ महिलेला (Psychiatrist) मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) आज 25 000 रुपयांचा जामीन मंजूर केला. (Mumbai high court bailed a psychiatrist woman in sanjay raut case-nss91)

पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर याचिकेद्वारे गंभीर आरोप केले आहेत. राऊत आणि पाटकर यांच्या पतीमुळे जीवाला धोका असल्याचा आरोप यामध्ये आहे. याबाबत तीन फौजदारी गुन्हे दाखल केले होते. पण मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी या तक्रांरींवर कारवाई केली नाही, असा युक्तिवाद एड आभा सिंह यांनी याचिकादाराकडून केला आहे. पाटकर यांना बोगस डिग्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

यामध्ये जामीन मिळावा यासाठी त्यांनी स्वतंत्र याचिका केली आहे. यावर आज न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने पाटकर यांना जामीन मंजूर केला असून पारपत्र दंडाधिकारींना सुपुर्द करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारकडून जामीनाला विरोध करण्यात आला. पाटकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. पाटकर यांच्या दुसऱ्या याचिकेवर औगस्टमध्ये सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस तपास करत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT