Mumbai High Court sakal media
मुंबई

दोन डोसचा नियम अव्यवहार्य; लोकल प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय ?

लोकल प्रवासाबाबत दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लशीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांनाच (Vaccination two dose) लोकल प्रवासाची (train permission) राज्य सरकारने (mva government) परवानगी दिली आहे. लस घेतलेले आणि लस न घेतलेले दोघेही कोरोना विषाणूचे (corona virus) सारक ठरू शकतात. त्यामुळे केवळ लसवंतांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा नियम अव्यवहार्य असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका (petition in Mumbai high court) करण्यात आली. त्यावर बुधवारपर्यंत (ता. १५) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

केंद्र सरकारने कोरोना लस ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतल्याची अट राज्य सरकारने ठेवणे अव्यवहार्य आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण करणारे आहे, ही बाब निदर्शनास आणून देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. वैद्यकीय सल्लागार योहान टेंग्रा यांनी ॲड. अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.

राज्य सरकारने लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे; मात्र हा निर्णय भेदभाव करणारा आहे आणि केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे. लस घेतलेले आणि न घेतलेले असे दोघेही विषाणू प्रसारक ठरू शकतात. त्यामुळे सरकारने असा भेदभाव करू नये, असे याचिकादारांनी म्हटले आहे. १५ डिसेंबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.

एक लस न घेतलेल्यांवरही अन्याय

सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या अटीमुळे लस न घेतलेल्यांना आणि एकच डोस घेतलेल्या नागरिकांवर अन्याय होत आहे आणि त्यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. रेल्वे प्रवास मूलभूत अधिकार असला, तरी सुरक्षेच्या दृष्टीने आणि परिस्थितीनुसार काही निर्बंध लादता येतात, असे मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT