Nawab Malik sakal media
मुंबई

वानखेडेंची बदनामी झाल्यास परिणाम भोगायला तयार राहा; हायकोर्टाचा मलिकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वानखेडे यांच्याबाबत वारंवार वक्तव्ये करून तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांची बदनामीच करीत आहात. याबाबत उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिलेले निर्देश पाळले नसतील, तर परिणाम भोगण्यास तयार राहा, असा इशारा उच्च न्यायालयाने आज मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना दिला. मलिक आणि वानखेडे यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात ज्ञानदेव वानखेडे यांनी ही याचिका सादर केली आहे.

त्यावर न्या. शारुख काथवाला व न्या. मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. बदनामीकारक विधाने न करण्याचे आदेश न्यायालयाने मलिक यांना दिले होते. तसे मलिक यांनी कबूलही केले होते, तरीही मलिक अजूनही वाटेल तशी विधाने करीत असल्याचा अर्जदारांचा दावा आहे. वारंवार वानखेडेंबाबत तुम्ही अशी वक्तव्ये का करीत आहात, त्यातून तुम्हाला काय मिळवायचे आहे, हे थांबले नाही तर यासंदर्भात तुम्हाला दिलेली सवलत काढून का घेऊ नये, असे प्रश्न खंडपीठाने विचारले.

अशी विधाने करून तुम्ही त्या व्यक्तीची बदनामीच करीत आहात, असेही खंडपीठाने मलिक यांना बजावले. मात्र आपण वानखेडेंबाबत करत असलेली विधाने ही हायकोर्टाच्या आदेशांच्या मर्यादेत राहूनच केलेली आहेत, असे मलिक यांच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे ही बाब सिद्ध करा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असा इशारा खंडपीठाने त्यांना दिला. याबाबत त्यांना शनिवारी प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT