बेस्ट प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले. esakal
मुंबई

Mumbai High Court : सेवानिवृत्तीची देयके देणे म्हणजे चॅरिटी नव्हे!

BEST Mumbai : उच्च न्यायालयाचे ‘बेस्ट’ला खडे बोल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai : कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी पैसे नसल्याचे रडगाणे गाणाऱ्या बेस्ट प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच खडे बोल सुनावले. वर्षानुवर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकीत देयके देणे म्हणजे चॅरिटी नव्हे तर ते बेस्ट प्रशासनाचे कर्तव्यच आहे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. देणी देण्यासाठी पालिकेची आर्थिक मदत घ्या आणि कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची थकीत देणी तीन महिन्यांत चुकती करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

वर्षानुवर्षे बेस्ट प्रशासनात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची देणी व इतर देणीही उपक्रमाने थकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. या याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

कर्मचाऱ्यांची देणी थकवली असल्याचे निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने प्रशासनाला धारेवर धरले. पैसे नाहीत ही सबब सांगू नका. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी पालिकेची मदत घ्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हजारो बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘पुढील सुनावणीला माहिती सादर करा’

बेस्ट व पालिका या दोन्ही प्रशासनांनी आदर्श काम केले पाहिजे, असे स्पष्ट करून निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रकमेची किमान ३० टक्के रक्कम पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत मिळाली पाहिजे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. देणी चुकती केल्याबद्दलची माहिती प्रशासनाने पुढील सुनावणीवेळी सादर करावी, असे नमूद करून खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी ९ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

Marathi language: रिक्षाचालकांना मराठीची सक्ती, पण बसस्थानकांवर इंग्रजी फलक; परिवहन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

SCROLL FOR NEXT