Nawab malik-samir wankhede google
मुंबई

मलिकांच्या विरोधातील जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

सुनिता महामुनकर

मुंबई : एनसीबी आणि विभागिय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर सतत आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात केलेल्या जनहित याचिकेवर (petition) तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज नकार दिला. मलिक यांना वानखेडे यांच्यावर आरोप करण्यापासून रोखावे अशी मागणी याचिकेत केली आहे.

मलिक यांना वानखेडे यांच्यावर आरोप करण्यासाठी मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका मौलवी कौसर जफर अली सय्यद यांनी एड अशोक सरोगी यांच्यामार्फत केली आहे. अमलीपदार्थ घेणाऱ्यांच्या पुर्नवसनासाठी काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मलिक यांनी एनसीबी आणि वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे तपास यंत्रणेचे आणि अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकार मधील मंत्री अशी विधाने करत असल्यामुळे हे अधिक त्रासदायक आहे. केवळ मनोधैर्य कमी व्हावे याच हेतूने मलिक सोशल मीडियावर सतत वानखेडे यांच्या विरोधात आरोप करत आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे.

वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासात धडाडी आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्यामुळे एनसीबी प्रभावीपणे काम करत आहे असे दिसते. अशा परिस्थितीत मलिक यांनी एनसीबी किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेविरोधात आणि अधिकार्यांविरोधात काहीही विधान करु नये आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास त्यांना मनाई करावी अशी मागणी करण्यात आली. याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला.

मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला. याचिकादारांनी हवे असल्यास सुट्टीकालीन न्यायालयात किंवा नियमित न्यायालयात याचिका दाखल करावी असे निर्देश खंडपीठाने दिले. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप केले असून यामध्ये व्यक्तिगत जीवनातील आरोपही आहेत. क्रुझवरील ड्रग प्रकरण फेक आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT