court sakal
मुंबई

सदस्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याची परवानगी का नाही? न्यायालयाचा सवाल

शाळा, महाविद्यालय, कार्यालये खुली झाली असताना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला सदस्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याची परवानगी का नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शाळा, महाविद्यालय, कार्यालये खुली झाली असताना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला सदस्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याची परवानगी का नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केला.

महापालिकेच्या स्थायी समितीला प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी केवळ अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्यांना परवानगी देण्यात आली आहे. याविरोधात काही सदस्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली. संबंधित याचिकेत तथ्य असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे. जर मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही तर मग सदस्यांना प्रत्यक्ष सभेला हजेरी लावण्यासाठी का मनाई केली जात आहे, असा प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला केला. जर बाजारपेठ, मौल, शाळा, महाविद्यालय असे सर्व आता सुरू होत आहेत.

विद्यार्थ्यांनी शाळेत जायला सुरुवात केली आहे. सर्व न्यायालये प्रत्यक्ष काम करीत आहेत. हौटेल सुरू आहेत. रस्त्यावर वाहतुकही सुरळीत चालू आहे. मग असे असताना महापालिकेच्या सभेला मोजक्या सदस्यांना प्रत्यक्ष बोलवण्यात आणि इतरांना औनलाईन हजर राहण्याची परवानगी देण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न खंडपीठाने केला. राज सरकारने येत्या पाच दिवसांत यावर ठोस निर्णय घ्यावा असे निर्देश खंडपीठाने दिले. सरकारच्या संबंधित विभागाने पाच दिवसात या बैठकीबाबत निर्णय घ्यावा, त्यापेक्षा अधिक कालावधी निर्णय घेण्यासाठी घेऊ नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

महापालिकेच्या वतीने प्रमुख वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचे सदस्यांना परवानगी दिली आहे, असा खुलासा त्यांनी केला. मात्र खंडपीठाने यावर असमाधान व्यक्त केले. याचिकेत उपस्थित मुद्यांमध्ये तथ्य आहे, याचिकादार सदस्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची परवानगी द्यायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. समितीच्या मागील व्हर्च्युअल सभेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यापुढे सर्व सभा प्रत्यक्ष घ्याव्यात अशी मागणी याचिकेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIA Cyberattack : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर मोठा सायबर हल्ला; एफबीआय अन् कृषी विभागही हॅकर्सच्या निशाण्यावर

Maharashtra Anganwadi News: अंगणवाडी सेविका-मदतनिसांसाठी मोठी बातमी! किती मिळणार प्रोत्साहन भत्ता? सरकारचे नवे नियम जाहीर

Gokul Dairy Election : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत आज सुनावणी; शासननियुक्त चार संचालकांचा मतदानाचा अधिकार योग्य की अयोग्य ठरणार

Nagpur News: गारगाई धरण, कोळसा खाण ते रेल्वे विस्तार! विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील लाखो झाडांवर कुऱ्हाड; धरणाचा वृक्षतोडीचा आकडा धक्कादायक

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

SCROLL FOR NEXT