Mumbai High Court sakal
मुंबई

Bombay High Court : वेश्याव्यवसाय गुन्हा नव्हे तर तो सार्वजनिकरित्या करणे गुन्हा - मुंबई उच्च न्यायालय

स्वतःच्या इच्छेने वेश्याव्यवसाय करणे बेकायदेशीर नाही, असा युक्तिवाद कऱण्यात आला होता.

वैष्णवी कारंजकर

वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाही, पण सार्वजनिकरित्या तो करणे हा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने एका ३४ वर्षीय वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुक्तता करण्याचे आदेश दिले. या महिलेला देवनार मधल्या सरकारी निवाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं.

मार्चमध्ये माझगावच्या न्यायाधिकाऱ्यांनी एक आदेश पारीत केला होता. त्यानुसार, या महिलेला तिची काळजी घेण्यासाठी, तसंच सुरक्षेसाठी तिला शासकीय निवाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं.या आदेशानंतर या महिलेने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. संविधानाच्या कलम १९ च्या अंतर्गत महिलेला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असं या महिलेच्या वकिलांनी सांगितलं.

शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत वकील पुढे म्हणाले की स्वतःच्या इच्छेने वेश्याव्यवसाय करणे बेकायदेशीर नाही, मात्र वेश्यांचा अड्डा किंवा कोठा चालवणे हे बेकायदेशीर आहे. ही महिला वेश्याव्यवसायामध्ये जबरदस्तीने आलेली नाही, त्यामुळे कोर्टाचा आदेश या महिलेच्या इच्छेच्या विरोधात आहे.

या महिलेची यापूर्वीही सुटका करण्यात आली होती आणि नंतर तिने देह व्यापारापासून दूर राहण्याचं कोर्टात लिहून दिलं होतं. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली होती. न्यायदंडाधिकार्‍यांनी केवळ पूर्वीच्या घटनेच्या आधारावर अटकेचा आदेश दिला होता, पण कलम १९ नुसार तिचे वय किंवा तिचा अधिकार विचारात घेतलेला नाही. कोर्टाने निदर्शनास आणून दिले की महिला सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करते असा कोणताही आरोप नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT