Ravi Rana_Navneet Rana 
मुंबई

हायकोर्टाचा राणा दाम्पत्याला दणका! FIR रद्दची मागणी याचिका फेटाळली

राणा दाम्पत्यानं आपल्यावरील एक FIR रद्द करावा या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : FIR रद्द करावा या मागणीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांना दणका दिला असून त्यांना फटकारत याचिका फेटाळून लावली. न्या. पी. बी. वरळे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठां हा निर्णय दिला. (Mumbai High Court slams Navneet Rana and Ravi Rana Petition seeking revocation of FIR rejected)

राणा दाम्पत्यानं तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती ती हायकोर्टानं फेटाळून लावली. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत, त्यामुळं दोन एफआयआर दाखल करण्याची मुंबई पोलिसांची भूमिका योग्य आहे. यामधून राज्य सरकारचा हेतूही स्पष्ट होतोय. दोन्ही प्रकरणांचा भिन्न तपास होणं आवश्यक आहे. मात्र, जो दुसरी एफआयआर आहे यामध्ये जर राणा दाम्पत्यावर कारवाई करायची असेल तर दोन्ही आरोपींना ७२ तास आधी नोटीस देणं मुंबई पोलिसांसाठी बंधनकारक असेल, थेट जाऊन त्यांना कुठलीही कारवाई करता येणार नाही, असं होयकोर्टानं म्हटलं आहे.

यामुळं या ७२ तासात पोलीस कारवाईला कोर्टात आव्हान देण्याचा राणा दाम्पत्याचा अधिकार आणि पर्याय खुला राहिल. मात्र, पहिल्या एफआयआरमध्ये दुसऱ्या एफआयआरचं ३५३ कलम समाविष्ट करुन दोन्ही प्रकरणं एकाच एफआयआरमध्ये समाविष्ट करा ही राणांची मागणी मान्य करता येणार नाही, असंही खंडपीठानं म्हटलं आहे. कारण नवनीत राणा या खासदार तर त्यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत. म्हणजेच हे दोघेही लोकप्रतिनिधी आहे. त्या कायद्याचा आदर करणाऱ्या व्यक्ती असतील तर पोलीस कारवाईला विरोध करणं योग्य नाही, अशा शब्दांत खंडपीठानं राणा दाम्पत्याला सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT