मुंबई

गुलशन कुमार हत्या प्रकरण: अब्दुल रौफ दाऊद मर्चंटची जन्मठेपेची शिक्षा कायम

- सुनीता महामुणकर

मुंबई : टी सिरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यात सत्र न्यायालयाने आरोपी अब्दुल रौफ दाऊद मर्चंटची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम ठेवली. (Mumbai High Court upheld the life sentence of accused Abdul Rauf Dawood Merchant murder case of Gulshan Kumar owner T-Series company)

सत्र न्यायालयाने ता 29 एप्रिल 2002 मध्ये रौफ मर्चंटला भादंवि कलम 302, 307, 120 ब इ. आरोपात ( हत्या, हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान) दोषी ठरविले होते. याविरोधात त्याने केलेल्या अपील याचिकेवर आज न्या साधना जाधव आणि न्या नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली. आरोपीची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे आणि तो एकदा फरारही झाला होता. त्यामुळे त्याचा सहानुभूतीने विचार होऊ शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. रौफला कलम 392 आणि 397 च्या आरोपातून न्यायालयाने मुक्त केले आहे.

न्यायालयाने अन्य आरोपी निर्माता रमेश तौरानी यांच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील नामंजूर केले आहे. त्यामुळे तौरानी यांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक कारणातुन गुलशन कुमार यांची 12 औगस्ट 1997 रोजी जुहूमध्ये हत्या झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT