नवजात बाळ sakal
मुंबई

Crime News : माणुसकीला लाज वाटते! नवजात अर्भकाच्या रडण्यामुळे संतापलेल्या नर्सने दूध पिणाऱ्या तोंडाला लावला टेप

सावित्रीबाई फुले प्रस्तुतिगृह चालवणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकेने एनआयसीयु मध्ये रडणाऱ्या नवजात बालकाच्या तोंडावर टेप लावला.

सकाळ वृत्तसेवा

माणुसकीला लाज वाटेल अशी लोकांना हादरून सोडणारी घटना मुंबईतील भांडुपमधून समोर आली आहे. सावित्रीबाई फुले प्रस्तुतिगृह चालवणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकेने एनआयसीयु मध्ये रडणाऱ्या नवजात बालकाच्या तोंडावर टेप लावला.

25 मे रोजी प्रियंका काळंबे नावाच्या एका महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर मुलाला कावीळ झाली असल्याने त्या मुलाला डॉक्टरांनी एनआयसीयुमध्ये ठेवले. 2 जून रोजी मुलाची आई प्रिया आपल्या मुलाला पाहण्यासाठी रात्री 11 वाजता एनआयसीयूमध्ये गेली असता, तेथे आपल्या मुलाला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला.

मुलाच्या तोंडावर टेप चिकटवल्याचे तिने पाहिले. चिकटवलेल्या टेपामुळे मूलाला रडता न आल्याने त्याचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता. याबाबत तिने नर्स सविता भोईर यांना विचारणा केली असता, नर्स तिच्याशी अत्यंत असभ्य आणि अपमानास्पद भाषेत बोलली. एवढेच नाही तर मुलाच्या रडण्यामुळे त्याच्या तोंडावर टेप चिकटवण्यात आल्याचेही नर्सने सांगितले.

रुग्णालयात गोंधळ, नर्सला निलंबित करण्यात आले

यानंतर महिलेने तत्काळ तिच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. पीडित कुटुंबीयांनी माजी नगरसेवक जागृती पाटील यांच्याकडे मदतीची मागणी केली. जागृतीला माहिती मिळताच ती हॉस्पिटलमध्ये पोहचली. तिथे मध्यरात्री बराच वेळ गोंधळ सुरू होता. त्यानंतर मुलाची आई व कुटुंबीयांनी डॉक्टरांना सांगितले की नवज्योत बाळाला आणि मला तत्काळ डिस्चार्ज द्यावा.

सध्या या प्रकरणाची रुग्णालय स्तरावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ हा रुग्णाच्या सोयीसाठी आणि काळजीसाठी असतो. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सिंग स्टाफ रुग्णाची काळजी घेतो, मात्र येथे वेगळीच घटना समोर आले आहे.

या संदर्भात एनआयसीयुनिटमध्ये काम करणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले असून, त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणाची ही पहिली घटना नसून, यापूर्वी रुग्णालयाचे एआयसीयुनिट मध्ये ठेवण्यात आलेल्या नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले होते.आता पुन्हा एकदा ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालयात जन्मलेल्या आणि दाखल झालेल्या नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT