मुंबई

कोविड- 19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या मुंबईतल्या रुग्णालयात 68% बेड रिक्त

भाग्यश्री भुवड

मुंबई: गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच मुंबई शहरातील कोविड -19 रूग्णांवर उपचार करणार्‍या प्रमुख कोविड रुग्णालये आणि केंद्रांमधील जवळपास 68 टक्के बेड आणि ऑक्सिजन बेड रिक्त असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. 

कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून समर्पित कोविड रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरलेली होती. रुग्ण वाढल्याने बेड मिळण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागत होती. मात्र आता ही परिस्थिती निवळली असून पालिका अधिकाऱ्यांनी आक्रमक उपचार प्रोटोकॉल आणि योग्य उपाययोजनांमुळे शक्य झाले असल्याचे सांगितले आहे. शिवाय, लोकांमध्येही वाढलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून 1000 च्या खाली रुग्णांची नोंद झाली आहे. जी अजूनही नियंत्रणात आहे. 

कमी झालेल्या रुग्णसंख्येसाठी काही महत्त्वाची कारणे

पालिका अधिकारी आणि आरोग्य तज्ञ देतात. मुंबईत गंभीर प्रकरणांची संख्या कमी आहे आणि अनेक लोक होम आयसोलेशनचा पर्याय निवडतात. प्रवेश कमी होण्याचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. मात्र, वॉर्ड-स्तरीय वॉर रूमची सोय केल्यामुळे रुग्णांना तात्काळ आवश्यक सेवा दिल्या गेल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डनुसार, 4 डिसेंबरपर्यंत, शहरात 12,926 सक्रिय रुग्ण आढळले. मात्र 16 हजार 735 डीसीएचसी, डीसीएच आणि सीसीसी 2 बेडपैकी केवळ 5 हजार 308 एवढेच बेड्स भरलेले होते. म्हणजे केवळ 31 टक्के रुग्ण या रुग्णालयांच्या आणि केंद्रांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्याचप्रमाणे 1,934 आयसीयूपैकी 780 बेड रिक्त आहेत. त्यानंतर 8 हजार 325 ऑक्सिजन बेडपैकी 5 हजार 690 आणि 1 हजार 166 व्हेंटिलेटर बेडपैकी 380 रिक्त आहेत.

दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, डिसेंबर आणि जानेवारीत कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र मुंबईच्या आरोग्याची पायाभूत सुविधा त्या हाताळण्यासाठी सुसज्ज आहेत.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या 71 टक्के गंभीर गुंतागुंत नसलेल्या रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर 23 टक्के लक्षणे आणि फक्त सहा टक्के गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासते. “मुंबईची सद्यस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. जवळपास 68 टक्के बेड रिक्त आहेत जे पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास वापरता येतील. बेडच्या कमतरतेमुळे रूग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आता येत नाहीत.

शिवाय, बरेच रुग्ण घरबसल्याच उपचार घेत आहेत. मोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे ते घरीच राहून त्यांच्यावर उपचार करण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची संख्या कमी झाली आहे. वॉर्ड-स्तरीय वॉर रूममधील डॉक्टर ही होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांचा पाठपुरावा करतात. बरेच रुग्ण डॉक्टरांचा सल्लाही घेतात. शहरात सध्या 835 गंभीर रूग्ण आहेत असेही काकाणी यांनी सांगितले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai hospital covid 19 treatment 68 Percentage beds vacant

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT