crime news esakal
मुंबई

Mumbai: पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने रचला कट;मात्र स्वतःच जाळ्यात अडकला

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अमीर मोहम्मद बोरा याला अटक केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी पैशांची उधळपट्टी करत असे जे त्याला कधीही पसंद नव्हते .दुबईतील आरोपीच्या सासूने घरासाठी 44 लाख रुपये पत्नीला दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- पत्नीला धडा शिकविण्यासाठी आणि दुबईतील सासूने पैसे लाटण्यासाठी लोखंडवाला येथे राहणाऱ्या व्यावसायिकाला लुटीचा बनाव रचल्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अमीर मोहम्मद बोरा याला अटक केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी पैशांची उधळपट्टी करत असे जे त्याला कधीही पसंद नव्हते .दुबईतील आरोपीच्या सासूने घरासाठी 44 लाख रुपये पत्नीला दिले होते.

म्हणून पत्नीला धडा शिकविण्यासाठी आणि दुबईतील सासूने घरासाठी दिलेले 44 लाख रुपये लाटण्यासाठी आरोपीने स्वतःच्या लुटीचा प्लॅन आखला.

गुरुवारी आरोपीने ना. म. जोशी मार्ग येथून जात असताना पोलीस असल्याची बतावणी करत चौकडीने त्याच्याकडील 44 लाखांची रोकड चोरून नेल्याची आग्रीपाडा पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी त्यांच्या माहितीच्या आधारे चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. मात्र आरोपीने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये तफावत दिसून आली. पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी करताच लूट झालीच नसल्याची माहिती समोर आली.

व्यावसायिकाच्या चौकशीत, पत्नी सतत पैसे खर्च करत होती. तिला पैशांची किंमत नव्हती. त्यात, सासूने घरासाठी 44 लाख रुपये दिले होते.

हे पैसेही पत्नी असेच खर्च करेल या भीतीने आणि पैसे चोरी झाल्याचे समजताच तिला पैशांची किंमतही समजेल म्हणून त्यांनी लुटीची खोटी माहिती दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

अखेर, पोलिसांनी मालाडच्या घरातून रोकड जप्त केली. याप्रकरणी आरोपी मोहम्मद बोराला शुक्रवारी रात्री अटक झाली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह 'या' दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

SCROLL FOR NEXT