Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : ठाणे,रायगड,पालघर जिल्ह्यातील नदीच्या पाणी पात्रात वाढ; नद्यांनी इशारा पातळी गाठली

पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यात मंगळवार पासून पावसाचा जोर वाढला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन बुधवारी सकाळी 15.60 मीटर वर उल्हास नदी वहात आहे.

16.50 नदीची धोका पातळी आहे. तर काळू नदीने धोका पातळी गाठली असून 102.20 मीटरने नदी वहात आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

यावर्षी पावसास उशिराने सुरवात झाली असली तरी सातत्याने पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची

संततधार सुरू असून सायंकाळनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी देखील शहर तसेच ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या, नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

बुधवारी सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पाणी पातळी गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे.

उल्हास नदीची इशारा पातळी 16.60 मीटर इतकी आहे. तर धोका पातळी 17.50 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उल्हास नदी बदलापुरात 15.60 मीटर पातळीवरून वाहत होती. तर याच नदीवर जांभूळ आणि मोहन येथे नोंदवलेली नदीची पातळी इशारा पातळीच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे.

अनुक्रमे 8 व 12.50 मीटरने येथील पाणी वहात आहे. तर त्यांची धोका पातळी की अनुक्रमे 9 व 13 मीटर इतकी आहे. बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला या नदीमुळे पुराचा फटका बसत असून या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच काळू नदी टिटवाळा बंधाऱ्याजवळ इशारा पातळीवर वाहते आहे. काळू नदीची इशारा पातळी 102 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळू नदी 102.20 मिटर या पातळीवरून वाहत होती. काळू नदीची धोका इशारा पातळी 103.50 मीटर इतकी आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहण्याची शक्यता आहे. तर

असाच पाऊस कायम राहिल्यास तसेच रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान आणि कर्जत परिसरात मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT