संस्कृती sakal
मुंबई

Mumbai : भारतीय संस्कृती...कला गुणांनी बहरला फडके रोड

स्वागत यात्रेनिमित्त सांस्कृतिक पथवर विविध कला सादर

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली,: महाराष्ट्र राज्य हे मराठमोळी संस्कृती, संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. मराठी संस्कृती समृद्ध करणणारे विविध सणवार, मराठमोळे, दागिने, परंपरा, विधी, रांगोळ्या, सणवारांशी निगडित पाककृती, व्रत वैकल्ये, विविध स्तोत्र यांसारख्या संस्कृतीशी निगडित विषयांना वाहिलेले संस्कृती दालन रविवारी डोंबिवलीतील फडके रोडवर अवतरले होते. नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने रविवारी सांस्कृतिक पथचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिकता आणि नवता यांचा संगम या सांस्कृतिक पथावर डोंबिवलीकरांना अनुभव घेता आला.

डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त रविवारी फडके रोडवरील अप्पा दातार चौक ते मदन ठाकरे चौकापर्यंत आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक पथचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वासुदेव, संबळी, गोंधळी अशा पंचमहाभूतांची दिंडी तसेच पर्यावरण दिंडीने झाले. पारंपारिक वेशभूषा परिधान करत महाराष्ट्रातील विविध जाती आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी या दिंडीतून घडविले.

अप्पा दातार चौक येथील रंगमंचावर योग प्रात्यक्षिक, सहा लोकनृत्य, मंगळागौरीचे खेळ अशा विविध कला सादर करण्यात आला. यामध्ये सुमारे 20 संस्था सहभागी झाल्या होत्या. वारली चित्रकला, वेदाक्षरे, स्वस्तिक - लक्ष्मीची पावले याप्रमाणे पारंपारिक चिन्ह, चैत्र महिन्यापासून सण, नऊवारी साडी, बाराबंदी अशा पद्धतीचे कट आऊट सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. याचा डोंबिवलीकरांनी आनंद लुटला.

घरकुल म्हणजेच पारंपारिक जुन्या घरातील वस्तू पाटा वरवंटा, जातं याठिकाणी मांडण्यात आले आहे. हे पहात त्यासोबत छायाचित्रे काढणे, वस्तू वापरून पाहणे असा आगळावेगळा आनंद नागरिकांना घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT